ज्येष्ठ महिला तब्बल दीड महिना ‘डिजिटल अरेस्ट’ ; सीबीआयच्या नावाने साडेतेरा लाख लुटले

 लाईव्ह महाराष्ट्र मराठी | दि.१८

 छत्रपती संभाजीनगर | जवाहर कॉलनी भागात एका ज्येष्ठ महिलेला तब्बल दीड महिना ‘डिजिटल अरेस्ट’ ठेवून तब्बल १३ लाख ५० हजार रुपयांना गंडा घातल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. आयपीएस आणि सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून सायबर भामट्यांनी ७३ वर्षीय वृद्धेला मनी लॉड्रिंगच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवली, आणि रोज व्हिडिओ कॉलवर त्यांची हजेरी घेतली. याप्रकरणी शोभा जोशी यांनी दिलेल्या तक्रारीवरून सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ डिसेंबर २०२५ रोजी जोशी यांना अनन्या शर्मा नावाच्या एका महिलेचा फोन आला आणि तिथूनच या फसवणुकीच्या थराराला सुरुवात झाली. आयपीएस, सीबीआयचे अधिकारी असल्याची थाप मारत सायबर भामट्यांनी ज्येष्ठ महिलेला तब्बल दीड महिना ‘डिजिटल अरेस्ट’ ठेवत रोज त्यांची व्हिडिओ कॉलवरून हजेरी घेतली. यादरम्यान मनी लॉड्रिंगचा आरोप करत तिच्याकडून तब्बल १३ लाख ५० हजार रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. शोभा जोशी (वय ७३, रा. जवाहर कॉलनी) यांनी याप्रकरणी दिलेली तक्रार अशी ८ डिसेंबर २०२५ ला त्यांना अनन्या शर्मा नावाने फोन आला.

तक्रारदार शोभा जोशी यांची मुले अमेरिकेत राहतात. या प्रकारानंतर त्या ८ फेब्रुवारीला अमेरिकेत गेल्या. हा प्रकार ऐकल्यानंतर मुलांनी गुगलवर आयपीएस सुनील कुमार गौतम याचा शोध घेतला. यावेळी गुगलवरील फोटो आणि व्हिडिओ कॉलवरील व्यक्ती वेगवेगळे असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे जोशी यांच्या लक्षात आले. दिल्लीतून बोलत असल्याचे सांगत तिने फिर्यादीच्या नावे असलेल्या मोबाइल क्रमांकाविरुद्ध तक्रार नोंदवल्याचे सांगितले. नंतर पोलिस गणवेषातील व्यक्तीने व्हिडिओ कॉल करत आयपीएस अधिकारी सुनील कुमार गौतम, अशी ओळख सांगितली. त्याने तुमच्या बँक खात्यातून मनी लाँड्रिंग झाल्याचे सांगितले. त्यानंतर दीड महिना रोज व्हिडिओ कॉलवर हजेरी घेतली. पडताळणीसाठी पैसे द्यावे लागतील, अशी मागणी करत पैसे उकळले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email0
Facebook20
X (Twitter)20
LinkedIn20
Share
Telegram20
WhatsApp20
Copy link
URL has been copied successfully!