स्वातंत्र्य दिनानिमित्त “देश मेरा रंगीला” नृत्य,गायन स्पर्धा १० ऑगस्टला संत एकनाथ रंग मंदिरात ; पालकमंत्री संजय शिरसाट, इतर मागास, बहुजन कल्याण मंत्री अतुल सावेंच्या उपस्थितीत होणार उदघाटन

छत्रपती संभाजीनगर | दि. २८ : युवामित्र फौंडेशन च्या वतीने मराठवाड्यातील सर्वात मोठा देशभक्तीचा १३ वा स्वाभिमानी सोहळा यंदा विद्यार्थी कलावंतांच्या बहारदार सादरीकरणाने रंगणार असून “देश मेरा रंगीला” या देशभक्तीपर आंतर शालेय व महाविद्यालयीन नृत्य व गीत गायन स्पर्धेचे आयोजन सोमवार (दि.१०) रोजी संत एकनाथ रंग मंदिर येथे करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजता सामाजिक न्याय तथा पालकमंत्री संजय शिरसाट, इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपरिक उर्जा, दिव्यांग कल्याण विभाग मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती  युवामित्र फौंडेशन चे अध्यक्ष तथा आयोजक सचिन लिला सुखदेव अंभोरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

यावेळी माजी केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे, माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, खासदार संदीपान भुमरे, खासदार डॉ. कल्याण काळे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, माजी खासदार इम्तियाज जलील,माजी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, आ. प्रदीप जैस्वाल, आ. नारायण कुचे, आ.अर्जुन खोतकर, आ. सतीश चव्हाण, आ. अब्दुल सत्तार,आ.प्रा.रमेश बोरणारे, आ. विलास बापू भुमरे, आ. प्रशांत बंब, आ. विक्रम काळे, आ. अनुराधा चव्हाण, आ.संजना जाधव, आ. सुहास शिरसाट, माजी आ.संजय केणेकर, आ. संतोष दानवे, महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, स्थायी समिती सभापती अनिल मकरीये, विरोधी पक्ष नेते समीर साजिद बिल्डर, सभागृह नेता गोविंद केंद्रे, शिक्षण सभापती प्रेमलता मिलिंद दाभाडे, समाज कल्याण विभाग सभापती जालिंदर शेंडगे, वैद्यकीय सहाय्य व आरोग्य सभापती सुनिता संजय साळुंके, जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे, उपाध्यक्ष जितेंद्र जैस्वाल, अर्थ व बांधकाम सभापती सचिन गरड, जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती अनिता मोठे, समाजकल्याण सभापती बालाजी सोनटक्के, महिला व बालकल्याण सभापती मीनाक्षी पवार, माजी महापौर नंदकुमार घोडेले, त्र्यंबक तुपे, भगवान घडामोडे, माजी उपमहापौर राजू शिंदे, डॉ.प्रमोद राठोड, विजय औताडे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रामबाबा शेळके, माजी सभापती डॉ. राधाकिसन पठाडे, छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष रामुकाका शेळके, पंचायत समिती सभापती कल्याण नाना गायकवाड, उपसभापती बाळासाहेब गाडे, आर.आर. पाटील फौंडेशन व अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान चे अध्यक्ष विनोद पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेस चे जिल्हाध्यक्ष अभिजित देशमुख, जिल्हा बँकेचे संचालक अनिल बोरसे, साईबाबा संस्थान चे अध्यक्ष राजेंद्र आदमाने पाटील, विधिज्ञ आशुतोष डंख, भाजप शहराध्यक्ष किशोर शितोळे, कॉंग्रेस चे जिल्हाध्यक्ष किरण डोणगावकर, यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अर्थ अभ्यासक तथा उद्योजक डॉ. डी.एस. काटे असतील तर विशेष उपस्थिती म्हणून जिल्हाधिकारी विनय गौडा, विभागीय आयुक्त जी.श्रीकांत, मनपा आयुक्त अमोल येडगे, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पी.एम. मिन्नु, सार्वजनिक बांधकाम विभाग मुख्य अभियंता अतुल चव्हाण, भगवान बाबा बालिका आश्रमाच्या संचालिका कविता वाघ हे असतील.

आपल्या धाडसी कर्तुत्वाने भारतीय सैन्य दलाने ऑपरेशन सिंदूर मोहीम राबवले. भारताच्या संरक्षणार्थ शहीद झालेल्या जवानांना कारगिल विजय दिवसानिमित्त मानवंदना देत त्यांच्या शौर्याचे स्मरण करत “देश मेरा रंगीला” हा स्पर्धा कार्यक्रम सादर करण्यात येत आहे. त्याचबरोबर शासनाच्या वतीने “हर घर तिरंगा” या अभियानाची जनजागृती या स्पर्धेतून केली जाणार आहे. देशभक्तीची भावना प्रत्येक विद्यार्थी, तरुणांमध्ये  जागृत व्हावी या उद्देशाने या स्पर्धा दरवर्षी सातत्याने आयोजित करण्यात येतात.  या स्वाभिमानी सोहळ्यानिमित्त युवामित्र फौंडेशन च्या वतीने “देश मेरा रंगीला’’ या आंतर शालेय, महाविद्यालयीन नृत्य व गीत गायन स्पर्धेचे आयोजन नेहरू युवा केंद्र, भारत सरकार, छत्रपती संभाजीनगर महानगर पालिका, सांस्कृतिक विभाग यांच्या सहकार्याने बिपीन मोशन पिक्चर्स, वेब न्युज लाईव्ह महाराष्ट्र मराठी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले असून कलाक्षेत्रात योगदान देणाऱ्या शहरातील कलावंतांचा यावेळी सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती युवामित्र फाउंडेशनचे अध्यक्ष तथा आयोजक सचिन लिला सुखदेव अंभोरे यांनी दिली. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण सायंकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असून शहरातील लोकप्रतिनिधी तसेच प्रशासकीय अधिकारी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहील. भारतीय कलांचे संवर्धन, जतन व्हावे या हेतुने छत्रपती संभाजी नगरच्या स्थानिक कलावंताच्या संकल्पनेतुन या सांस्कृतिक स्पर्धा कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे. या कार्यक्रमात समुह नृत्यासाठी शहरातील शाळा/महाविद्यालय तसेच विविध खाजगी डान्स ग्रुप सहभागी होणार असून शालेय, महाविद्यालयीन व खुल्या गटात या स्पर्धा होतील. यामध्ये नर्सरी ते  ४ थी अ गट, ५ वी ते १० वी ब गट आणि महाविद्यालयीन, खुल्या डान्स ग्रुप साठी क गट असेल. प्रत्येक विजेत्या स्पर्धक व संघास स्मृतिचिन्ह तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन युवामित्र फौंडेशन च्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 9970409640 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email0
Facebook20
X (Twitter)20
LinkedIn20
Share
Telegram20
WhatsApp20
Copy link
URL has been copied successfully!