लाईव्ह महाराष्ट्र मराठी | दि. १४
छत्रपती संभाजीनगर | शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ . श्रीकांतजी शिंदे यांच्या आदेशाने शिवसेना महिला आघाडीच्या वतीने दोन दिवसीय “शिवदुर्गा संवाद दौऱ्याचे” आयोजन करण्यात आले आहे. १५ व १६ जूनला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ९ विधानसभा मतदारसंघ संभाजीनगर पूर्व ,पश्चिम, मध्य, वैजापूर, गंगापूर, कन्नड, पैठण, सिल्लोड, फुलंब्री या ठिकाणी बैठका होणार आहेत.
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा छत्रपती संभाजीनगर चे पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भूमरे, आमदार प्रदीप जैस्वाल, आ. रमेश बोरणारे,आ.अब्दुल सत्तार, आ. विलास भुमरे, आ.संजना जाधव, महिला आघाडीच्या नेत्या मनीषा कांबळी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना महिला आघाडीच्या सचिव मनिषाताई कायंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सदरील बैठका होतील. या बैठकीत संघटनात्मक बांधणी, महिलांचे प्रश्न, पक्ष वाढवण्यासाठी कशा प्रकारे काम करावे या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या बैठकीस महिला जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख , शहरप्रमुख, उपशहरप्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख, गटप्रमुख, आजी-माजी शिवसेना महिला पदाधिकारी सर्व आजी-माजी पंचायत समिती जिल्हा परिषद नगर परिषद सदस्य यांनी मोठ्या संख्येने बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा संपर्क प्रमुख प्रतिभा जगताप, जिल्हाप्रमुख पुष्पा गव्हाणे, जिल्हाप्रमुख, सुलभा भोपळे, महानगर प्रमुख शारदा घुले तसेच समस्त शिवसेना महिला आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.
अशा असतील बैठका…
१) १५ जून सोमवार रोजी कन्नड व सिल्लोड मतदार संघ
स्थळ:-गजानन हेरिटेज, कन्नड
वेळ:-सकाळी ११-०० वाजता.
२)१५ जून सोमवार रोजी पैठण व फुलंब्री विधानसभा मतदारसंघ बैठक
वेळ :-दुपारी ४-०० वाजता
स्थळ :-पैठण.
३) १६ जून मंगळवार वैजापूर- गंगापूर मतदारसंघ
वेळ:- ११-०० वाजता
स्थळ:- मा. आमदार रमेश बोरणारे सर यांचे कार्यालय वैजापूर.
४) १६ जून मंगळवार संभाजीनगर पुर्व,पश्चिम ,मध्य या विधानसभा मतदारसंघाची संयुक्तीक बैठक.
वेळ:-दुपारी ४-00 वाजता
स्थळ : हॉटेल ओरीस कोकणवाडी येथे बैठका होणार आहे.