लाईव्ह महाराष्ट्र मराठी न्युज नेटवर्क | दि.११
छत्रपती संभाजीनगर | संबंध महाराष्ट्रभर भारतीय जनता पार्टीच्या विषमतावादी विचारांच्या सरकारने आरक्षण उपवर्गीकरणाच्या नावाखाली महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या संविधानिक मुल्यांना पायदळी तुडविण्याचे षडयंत्र केल्याचा ठपका ठेवत ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगरातील आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ एकवटली असून छत्रपती संभाजीनगर मधील आंबेडकरी कार्यकर्त्यांनी तमाम आंबेडकरी गायकं कवी जलसाकार प्रबोधनकार यांना एकाच मंचावर येत शनिवारी (दि. १२) रोजी निराला बाजार येथील तापडिया नाट्य मंदिरात सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे सरकारला धारेवर धरणार आहेत.
मनुवादी सरकारच्या बटीक झालेल्या न्याय व्यवस्थेच्या माध्यमातून दिवसाढवळ्या लोकशाहीची हत्या केली जातं आहे त्यातील एक निर्णय हा अनुसूचित जातींमधील आरक्षण उपवर्गीकरणाचा आहे, या विषारी आणि जातीय संघर्ष निर्माण करणाऱ्या निर्णया विरोधात डोळस आणि सजग आंबेडकरवाद्यांनी सर्वच स्तरावर या मनुवादी सरकारला धारेवर धरून यांच्या या षडयंत्रकारी अजेंड्याला कडाडून विरोध केलेला आहे मग यात बाबासाहेबांचे मानवतावादी विचार पेरणारी सांस्कृतिक आघाडी मागे राहू नये याकरिता छत्रपती संभाजीनगर मधील आंबेडकरी कार्यकर्त्यांनी तमाम आंबेडकरी गायकं कवी जलसाकार प्रबोधनकार यांना एकाच मंचावर आणले असून हे सर्व कलावंत उद्या दिनांक 12 सप्टेंबर 2026 शनिवार रोजी संध्याकाळी 6 वाजेला तापडिया नाट्यमंदिर निराला बाजार येथे आयोजित आंबेडकरी सांस्कृतिक चळवळीचे शिलेदार या कार्यक्रमाचे आयोजन केले असून आंबेडकरी अनुयायांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशे आवाहन या कार्यक्रमाचे आयोजक आंबेडकरी कार्यकर्ते विजय वाहुळ विशाल इंगळे व इतर कार्यकर्त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
