जिल्हा श्री गणेश महासंघ च्या वतीने महापुरुषांच्या स्मारकांची स्वच्छता करून अभिवादन

लाईव्ह महाराष्ट्र मराठी न्युज नेटवर्क | दि.१६  

छत्रपती संभाजीनगर | जिल्हा श्री गणेश महासंघ उत्सव समितीच्या वतीने “श्री गणेशोत्सव” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून यानिमित्ताने विविध समाजाभिमुख उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत श्री गणेश भक्तांचा सहभाग वाढावा या उद्देशाने मंगळवारी (दि.१५) शहरातील विविध भागात महापुरुष स्मारक स्वच्छता अभियान राबविण्यात आले

संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार यांच्या मार्गदर्शनात व जिल्हा श्री गणेश महासंघ उत्सव समिती अध्यक्ष हरिभाऊ हिवाळे यांच्या नेतृत्वात क्रांती चौक येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून महापुरुष स्मारक स्वच्छता अभियानास प्रारंभ करण्यात आला. यावेळी सुरेश वाकडे, डॉ. बाळासाहेब थोरात, राजु बागडे, अभिषेक देशमुख, दिनेश राजेभोसले, राजेश मेहता, संदिप शेळके, विशाल दाभाडे, नागेश फुले, विशाल जाधव, आयुष थोरात आणि प्रसिद्धी प्रमुख सचिन अंभोरे यांची उपस्थिती होती. पैठण गेट येथील लोकमान्य टिळक, स्वातंत्र्य सेनानी गोविंदभाई श्रॉफ, संभाजीपेठ येथील क्रांतिसूर्य महात्मा फुले, क्रांतिज्योती सावित्री बाई फुले, मिल कॉर्नर येथील छत्रपती राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ समोरील नामांतर लढ्यातील शहीद स्तंभ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक तसेच महर्षी दयानंद चौक येथील शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकांची साफ – सफाई करून अभिवादन करण्यात आले. आहे. या अभिनव उपक्रमास छत्रपती संभाजीनगर महानगर पालिका अग्निशमन विभागाचे वाहचालक सतीश शेळके, फायर मॅन उमेश भोसले, मनसुबराव सपकाळ, प्रसाद शिंदे यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email0
Facebook20
X (Twitter)20
LinkedIn20
Share
Telegram20
WhatsApp20
Copy link
URL has been copied successfully!