नाटकाचे विविध ‘रंग’ म्हणजे उत्कर्ष थिएटर ; महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक विभाग आयोजित ६५ व्या हौशी नाट्य स्पर्धेत सादरीकरण

लाईव्ह महाराष्ट्र मराठी न्युज नेटवर्क | दि. २१  

शब्दांकन: रेणुका महामुने, अभिनेत्री,लेखिका

सप्तरंगी,सुंदर! आयुष्य असताना देखील माणूस केवळ सकारात्मक ‘दृष्टीने’ बघता न आल्याने आपले आयुष्य केव्हा आपणच  ‘ब्लॅक अँड व्हाईट’ करून घेतो, हे त्याला ही कळत नाही. तर दुसरीकडे ज्यांना ‘रंग ‘ काय? हेच माहिती नसते ती माणसं मात्र त्या ‘ ब्लॅक अँड व्हाईट’ आयुष्य करून घेतलेल्या माणसाच्या आयुष्यात कायमचे ‘रंग’ पेरते.

आजकाल माणसं पैसा, भौतिक सुख- सुविधा, अनावश्यक गरजा,खोटे यश मिळवण्यासाठी वाट्टेल त्या थराला जात हळूहळू स्वतःतील माणुसकी मात्र विसरत चालले आहेत.हेच विनय ह्या वीस वर्षीय जेन झी मुलाच्या कुटुंबात बघायला मिळते. मग ते स्वतःच्या स्वार्थापायी ,बचावासाठी आईच घरातून निघून जाण असो, सावत्र वडिलांचं घरासाठी मुलाला घरातून काढून देणं असो की विनय सारख्या जेन – झी मुलाच वेड्या प्रेमापायी,डिप्रेशनमुळे अखेर आत्महत्येची वाट धरणं असो. तर दुसरीकडे रेल्वे स्टेशनवरील रंगीबेरंगी आयुष्य जगणारे अंध व्यक्ती. वास्तविक पाहता प्रत्येकाच्या आयुष्याचा रंग उडालेली ही मंडळी मात्र स्वतःचा सकारात्मकतेचा एक स्वतंत्र रंग घेऊन, आलेल्या प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य सप्तरंगी करू पाहणारी ही खरी माणसं. मग, ते पाकीट हरवलेल्या मुलाला निसंकोचपणाने पैशांची मदत करणं असो की मजबुरीने वैश्या झालेल्या बाईला लेकीसमान मानत प्रेमाचे दोन शब्द बोलणं असो.की या विकृत माणसांच्या जगात तृतीय पंथ असलेल्यांना वाईट नजरा, चुकीचा व्यवहार शी सामना करत असताना दुसरीकडे या अंधव्यक्तींकडून स्वतःला सुरक्षित वाटणं असो. अखेर विनयसारख्या आत्महत्या करू पाहणाऱ्या, आपल्यामुळे कुणाचे तरी प्राण गेले या चिंतेपायी,खचलेल्या, निराशेने ग्रासलेल्या जेन- झी मुलाला, माधव ‘आपले डोळे याच्यामुळेच गेले’ हे माहित होऊन सुद्धा त्याला क्षमा करतो आणि त्याला नव जीवदान देतो.केवळ त्याच्यातील ‘माणुसकी’ अजूनही ‘जिवंत’ होती म्हणून !

अश्या प्रकारे ‘रंग’ बद्दल सांगता येईल. नाटकातील सर्वच कलाकारांनी आपआपले पात्र रंगमंचावर जिवंत केले आहेत.कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या माध्यमातून लेखक प्रेक्षकांपर्यंत अचूकरित्या पोहोचवला आहे.तर सुमित शर्मा यांनी दिग्दर्शक म्हणून नाटकाला न्याय देत, यशस्वी प्रयत्न केला आहे. या नाटकाचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे नेपथ्य व प्रकाशयोजना! नेहमीसारखा बॉक्स सेट न वापरता कल्पक घर, तर हुबेहूब रेल्वेस्टेशन रंगमंचावर उभे करण्यात नेपथ्यकार यशस्वी ठरले.   ‘रेल्वे रंगमंचावर आली तर?’ प्रकाशयोजनाकार मुळे याची प्रचिती रंगमंचावर प्रेक्षकांना अनुभवायला मिळाली. ‘रंग’ या नावाप्रमाणे विविध भावना विविध प्रकाशाच्या रंगातून रेखाटत संपूर्ण रंगमंच रंगमय करण्यात प्रकाश योजनाकार यशस्वी ठरले. प्रत्येक पात्राचा स्वतंत्र रंगाचा शोध घेत  चेहऱ्यावरील रंगछटा अचूकरित्या उमटवल्या आहेत रंगभूषाकाराने! तर टेक्सचर, पोस्चर, लाईनसचा नीट विचार करत, प्रत्येक पात्राचे व्यक्तिमत्व खुलवण्यात वेशभूषाकार ने महत्वाची भूमिका बजावली आहे. आवाजाविना नाटक अशक्य,अशी कल्पना ही करवत नसताना  दृश्यामधील भीती, उत्सुकता,आश्चर्य,आनंद, खेद इ.भावना आपल्या पार्श्वसंगीतातून प्रेक्षकांना  अनुभवायला मिळाल्या. अश्याप्रकारे लेखक, नाट्यअभिनेते सतीश लिंगडे व विनोद जैतमल लिखित आणि जालन्याचे आघाडीचे नाट्य दिग्दर्शक,अभिनेते सुमित शर्मा दिग्दर्शित दोन -अंकी मराठी नाटकाचा यशस्वी प्रयोग दि.१७ नोव्हेंबर २०२६ रोजी पार पडला. ६५ वी महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धा २०२६ या स्पर्धेत तापडिया नाट्यमंदिर,छत्रपती संभाजीनगर या केंद्रावर दरवर्षी नवीन, ताकदीचे विषय घेऊन येणारी,नवनवीन प्रयोग करणारी ही नाट्यकलावंत उत्कर्ष थिएटर,जालना या बहूउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून काही वर्षांपासून दरवर्षी तृतीय, द्वितीय,प्रथम क्रमशःअसा सलग एक नवा इतिहास घडवताना दिसत आहे.यामागे त्यांची वर्षानुवर्षाची  मेहनत,चिकाटी,धैर्य दिसून येते. उत्कर्ष थिएटर जालना च्या पुढील प्रयोगासाठी मनस्वी शुभेच्छा!

श्रेय नामावली : 

दोन अंकी नाटक : “रंग”

लेखकः सतीश लिंगडे, विनोद जैतमहाल |दिग्दर्शकः सुमीत शर्मा

नेपथ्यः मिलिंद दुसे, संजय भिंगारे |संगीतः नीलेश सपकाळ

रंगभूषाः वर्षाराणी कोळवले |प्रकाश योजना : संतोष गौतम, रेणू महामुने | वेशभूषाः संध्या शर्मा

कलावंतः  सतीश लिंगडे, रेखा चव्हाण, सुमीत शर्मा, सुकृती काकडे, सुनील शर्मा, विनोद जैतमहाल,

पवन खांदे, सानवी संवरकर, कपिल रोडगे, गौरी गिल्डा, गणेश लोखंडे, सुरेश कांबळे, चिन्मय जैतमहाल,

अथांग लिंगडे, हर्ष वैद्य, मंथन लिंगडे, सोहन भुरेवाल, लखन मुंगसे, आशय काळोखे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email0
Facebook20
X (Twitter)20
LinkedIn20
Share
Telegram20
WhatsApp20
Copy link
URL has been copied successfully!