भगवान बाबा बालिकाश्रमाच्या संचालिका कविता वाघ/घुगे यांना महाराष्ट्र शासनाचा “अहिल्याबाई होळकर” पुरस्कार देऊन सन्मान

लाईव्ह महाराष्ट्र मराठी | दि.१०

छत्रपती संभाजीनगर | गेल्या वीस वर्षांपासून अनाथांची निःस्वार्थ सेवा करणाऱ्या आणि आपल्या आईसारखा सांभाळ करत प्रेम करणाऱ्या समाजसेविका तथा भगवान बाबा बालिकाश्रमाच्या संचालिका कविता वाघ/घुगे यांना महाराष्ट्र शासनाचा “अहिल्याबाई होळकर पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र दिनी पालकमंत्री तथा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळ्यात त्यांचा सन्मान करण्यात आला.

कविता वाघ-घुगे यांनी राज्यभरातील असंख्य अनाथ मुला-मुलींना आपल्या आश्रमात संस्कार, शिक्षण आणि आश्रय देऊन त्यांना चांगले अधिकारी घडविण्याचे समाजकार्य केले आहे. अनेक अनाथ मुलींची आई बनवून त्यांनी कन्यादान करत पालकत्व स्वीकारले आणि त्यांचे विवाह लावून दिले. आज महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात त्यांची अनाथ मुले-मुली ताठ मानेने आपली जबाबदारी पार पाडत आहे. अनाथ असल्याची कोणतीही भावना या मुला-मुलींच्या मनात येऊ न देता आई सारखी माया लावल्याने आणि तेवढ्याच ताकदीने मुला-मुलींना घडवील्याने त्यांच्या या कार्याची प्रधान्याने दखल घेत महाराष्ट्र राज्य शासनाने त्यांना “अहिल्याबाई होळकर पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. त्यांच्या या सन्मानाबद्दल सर्व क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email0
Facebook20
X (Twitter)20
LinkedIn20
Share
Telegram20
WhatsApp20
Copy link
URL has been copied successfully!