डिवाइन विस्डम फाउंडेशन च्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वितरण

​​छत्रपती संभाजीनगर: दि २० : सामाजिक बांधिलकी जपत आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणतीही अडचण येऊ नये या उद्देशाने ‘डिवाइन विस्डम फाउंडेशन’च्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला शहरातील विविध शाळांमध्ये शालेय गणवेशांचे (युनिफॉर्म) वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद पाहायला मिळाला.

शहरातील अनेक शाळामध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थी गणवेशपासून वंचित राहू नये तसेच त्यांच्या शिक्षणात अडथळा निर्माण होऊ नये यासाठी ‘डिवाइन विस्डम फाउंडेशन महाराष्ट्रातील विविध शाळामध्ये विविध शैक्षणिक उपक्रम राबवत आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून गणवेश वितरणातून खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करण्यात आला.
हा उपक्रम राबविण्यासाठी ‘डिवाइन विस्डम फाउंडेशन’च्या ​अध्यक्षा कोमल बन्सवाल,​उपाध्यक्ष अमोल खजिनदार, निलेश घोडके, नेहा बन्सवाल, सुभाष भदरगे यांनी पुढाकार घेतला. “सक्षम विद्यार्थी” या उपक्रमा अंतर्गत हा कार्यक्रम घेण्यात आला. शहरातील ​मराठा प्राथमिक स्कूल,​ श्री शिवाजी प्राथमिक स्कूल,विश्राम बाबा प्राथमिक स्कूल, ​या शाळांमध्ये गणवेश वाटप करण्यात आले. या प्रसंगी मुख्याध्यापिका सौ. प्रांजल गोचके, सौ. आशा गवळी, श्री. स्वप्निल इधाटे सर, यांची उपस्थिती होती.

​हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी ‘डिवाइन विस्डम फाउंडेशन’चे सदस्य तसेच संबंधित सर्व शाळांचे कर्मचारी आणि शिक्षकवृंद यांनी विशेष सहकार्य केले. या सर्वांचे फाउंडेशनच्या वतीने मनापासून आभार मानण्यात आले. भविष्यातही विद्यार्थ्यांच्या हितासाठी अशाच प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविण्याचा संकल्प फाउंडेशनच्या अध्यक्षा कोमल बन्सवाल यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email0
Facebook20
X (Twitter)20
LinkedIn20
Share
Telegram20
WhatsApp20
Copy link
URL has been copied successfully!