गरुड झेप गणेश मंडळ जय भवानी नगरात यंदा साकारणार काशी विश्वनाथ मंदिराचा भव्य देखावा पवित्र आकर्षक गंगा आरती चा देखावाही ठरणार लक्षवेधी

नियोजन व कार्यकारिणी निवड जाहीर | अध्यक्षपदी हरिभाऊ बकाल उपाध्यक्ष रणजीत मोरे तर सचिवपदी दिलीप हाजबंद यांची निवड

लाईव्ह महाराष्ट्र मराठी न्युज नेटवर्क | दि.३  

छत्रपती संभाजीनगर | जय भवानीनगर येथील गरुड झेप मित्र मंडळ आयोजित गरुड झेप गणेश उत्सव २०२६च्या नियोजन व कार्यकारिणी निवडीची बैठक मोठ्या उत्साहात संपन्न झाली. गरुड झेप मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद दिवेकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीस मंडळाचे अध्यक्ष किशोर ठुबे, उपाध्यक्ष सुनील बडसल व सचिव विठ्ठल शेलार यांची प्रमुख उपस्थिती होती.

गरुड झेप मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक परंपरा जपत गणेशोत्सवाचे आयोजन केले जाते. विविध आकर्षक व भव्य देखाव्यांची परंपरा यंदाही कायम ठेवण्यात आली असून, बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या आणि देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या काशी विश्वनाथ मंदिराचा भव्य देखावा तसेच वाराणसीच्या पवित्र गंगेच्या तीरावरील आकर्षक ‘गंगा आरती’चा देखावा यावर्षी साकारण्यात येणार असल्याची घोषणा बैठकीत करण्यात आली. या देखाव्याच्या माध्यमातून भाविकांना काशी विश्वनाथ मंदिराच्या धार्मिक व सांस्कृतिक वैभवाची अनुभूती देण्याचा मंडळाचा मानस आहे. बैठकीत आगामी गणेशोत्सवाचे नियोजन, विविध उपक्रम तसेच उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली. यापूर्केवी गरुड झेप मित्दार मंडळाच्रया वतीने नाथ 2022, आदियोगी 2023, पशु पतीनाथ 2024, दुर्गा पेंडाल 2025, हे देखावे साकारण्यात आले.

नवनिर्वाचित कार्यकारिणी खालील प्रमाणे :

अध्यक्ष : हरिभाऊ बकाल

उपाध्यक्ष : रणजीत मोरे

सचिव : दिलीप हाजबंद

नियोजन समिती प्रमुख : संजय गावंडे , गोरख धाटबळे, सचिन तुरोरीकर, व्यंकटेश मुंडे, महेश खरात

स्वागत समिती प्रमुख : सुभाष ठाकरे, मंगेश राठोड, प्रशिक बिरारे, साईराज पवार, प्रसाद राजगुरू

प्रसिद्धी समिती प्रमुख : निरंजन तिवारी, आदित्य डहाळे , अजय राठोड, साई अहिरे, सागर तांगडे, सचिन लिला सुखदेव अंभोरे.

आगामी गणेशोत्सव अधिक भव्य, शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्याचा निर्धार सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. बैठकीस मंडळाचे वाल्मीक पवार, प्रल्हाद ढवळे, राहुल दांडगे, ज्ञानेश्वर शिंदे,पंकज थोरात, दिनेश काटकर, नारायण रोकडे, नागनाथ आवळे, हनुमान गंगाधर, रवींद्र महामुने , संतोष सोनवणे, संतोष एखंडे, कैलास खरात, दीपक सोनवणे, आत्माराम चिंचोले, अभिजीत गरकल , शिवाजी शेलार, कोमलसिंग पवार, सचिन राठोड, प्रतीक तांदळे, राहुल जाधव, सुखदेव गायकवाड, केतन गायकवाड, सुरज मैड, सोहम कदम, श्याम  क्षीरसागर, शुभम मढीकर, सागर पवार, ऋत्विक पवार, रितेश शेलार* अतुल क्षिरसागर व इतर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काशी विश्वनाथ मंदिराचा इतिहास :

काशी विश्वनाथ मंदिर हे भगवान शिवाला समर्पित भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि प्राचीन तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. हे मंदिर उत्तर प्रदेशातील वाराणसी (काशी) शहरात गंगा नदीच्या पश्चिम तीरावर आहे. येथे भगवान शिवाची ज्योतिर्लिंग स्वरूपातील विश्वनाथ म्हणून पूजा केली जाते.

📜 प्राचीन इतिहास

काशीला हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र नगरी मानले जाते. पुराणांनुसार काशी ही भगवान शिवाची नगरी असून, येथे असलेले विश्वनाथ ज्योतिर्लिंग बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. मंदिराचा मूळ इतिहास अतिशय प्राचीन मानला जातो; मात्र प्राचीन मंदिराची नेमकी स्थापना कोणत्या काळात झाली याबाबत ऐतिहासिक पुरावे मर्यादित आहेत. मंदिरावर अनेक वेळा आक्रमणे झाली आणि त्याची पुनर्बांधणीही करण्यात आली.

⚔️ मध्ययुगीन काळ

मध्ययुगात काशीवरील राजकीय संघर्षांमुळे मंदिराचे अनेकदा नुकसान झाले. १२व्या–१३व्या शतकापासून पुढे मंदिराच्या विध्वंस व पुनर्बांधणीचे उल्लेख विविध ऐतिहासिक स्रोतांमध्ये आढळतात. १६६९ मध्ये औरंगजेबाच्या कारकिर्दीत जुन्या विश्वनाथ मंदिराचा विध्वंस करण्यात आला, असे इतिहासाच्या अनेक स्रोतांमध्ये नमूद आहे. त्यानंतर त्या परिसरात ज्ञानवापी मशीद उभारण्यात आली.

🛕 अहिल्याबाई होळकरांचे योगदान

आजचे काशी विश्वनाथ मंदिर इ.स. १७८० मध्ये इंदूरच्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी बांधून घेतले, असे सर्वमान्य ऐतिहासिक वर्णन आहे. अहिल्याबाई होळकर यांनी काशीतील धार्मिक स्थळांच्या पुनर्बांधणीत मोठे योगदान दिले. त्यांच्या कार्यामुळे काशी विश्वनाथ मंदिराला पुन्हा भव्य स्वरूप प्राप्त झाले.

🪙 सुवर्ण कळस

१९व्या शतकाच्या सुरुवातीला रणजीत सिंह यांनी मंदिराच्या शिखरासाठी मोठ्या प्रमाणात सोन्याचे दान केले. त्यामुळे मंदिराच्या शिखराला आणि कळसाला सुवर्णवैभव प्राप्त झाले आणि मंदिराला “गोल्डन टेंपल” म्हणूनही ओळख मिळाली.

🌸 आधुनिक काळ

काशी विश्वनाथ मंदिर आज भारतातील सर्वाधिक श्रद्धेची केंद्रे असलेल्या मंदिरांपैकी एक आहे. २०२१ मध्ये काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉरचा पहिला टप्पा पूर्ण होऊन मंदिर परिसराचा मोठ्या प्रमाणावर विकास करण्यात आला. या प्रकल्पामुळे मंदिर आणि गंगा घाट यांच्यातील परिसर अधिक प्रशस्त व सुलभ झाला.

🔱 धार्मिक महत्त्व

हिंदू श्रद्धेनुसार : काशी ही भगवान शिवाची नगरी मानली जाते. विश्वनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन अत्यंत पुण्यदायी मानले जाते. काशीमध्ये मृत्यू झाल्यास मोक्ष प्राप्त होतो, अशी धार्मिक श्रद्धा आहे. गंगा स्नान आणि विश्वनाथ दर्शन यांना विशेष धार्मिक महत्त्व आहे. थोडक्यात: काशी विश्वनाथ मंदिराचा इतिहास हा प्राचीन धार्मिक परंपरा, अनेक पुनर्बांधण्या, संघर्ष आणि भक्तीच्या अखंड परंपरेचा इतिहास आहे. आजचे मंदिर मुख्यतः महाराणी अहिल्याबाई होळकरांनी १७८० मध्ये केलेल्या पुनर्बांधणीशी जोडले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email0
Facebook20
X (Twitter)20
LinkedIn20
Share
Telegram20
WhatsApp20
Copy link
URL has been copied successfully!