विविध स्तरावर खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी “प्राईड ऑफ सिटी” पुरस्कार देऊन केला जाणार खेळाडूंचा सन्मान ; गोविंदा पथकांची उत्सुकता शिगेला ; गोविंदा पथकाने सहभागी होण्याचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रमोद राठोड यांचे आवाहन
लाईव्ह महाराष्ट्र मराठी न्युज नेटवर्क | दि.३
छत्रपती संभाजी नगर | सूर वाद्याच्या तालावर गोविंदा पथकाचे उत्कंठा वाढविणारे एकावर एक थर… पाहणाऱ्या प्रत्येकाचे डोळे दीपावणारे प्रत्येक क्षण… आणि उंचावर असलेल्या दहीहंडीला स्वाभिमानी मानाची सलामी यंदा दिमाखदार सोहळ्यात कॅनॉट प्लेस येथे शनिवारी (दि.५) स्वाभिमान क्रीडा मंडळाच्या वतीने देण्यात येणार आहे. या सोहळ्याची गोविंदा पथकात असलेली उत्सुकता शिगेला पोहोचली असून दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी स्वाभिमान क्रीडा मंडळाच्या वतीने सिडको कॅनॉट प्लेस येथे स्वाभिमान दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद राठोड, उपाध्यक्ष धनंजय अतकरे, संस्थापक सचिव विशाल दाभाडे, अध्यक्ष समीर लोखंडे, कार्याध्यक्ष अमर ठाकूर यांनी दिली.
सामाजिक बांधिलकी जपत आणि पर्यावरणाचा समतोल राखत यावर्षी दहीहंडी महोत्सव साजरा करण्यात येत असून शहरातील सर्वप्रथम मानाची दहीहंडी गोविंदा पथकाच्या सहभागाने सलामी देऊन फोडण्यात येणार आहे. दुपारी दोन वाजता या महोत्सवाला प्रारंभ होणार असून गोविंदा पथक दरवर्षी या दहीहंडीला सर्वप्रथम सहभागी होतात व नंतर इतर ठिकाणी जात असतात. मागील वर्षी ४० हून अधिक गोविंदा पथकाने या स्वाभिमान दहीहंडी महोत्सवात आपला सहभाग नोंदविला होता. यंदा गोविंदा पथकाचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती आयोजक तथा स्वाभिमान क्रीडा मंडळाचे अध्यक्ष प्रमोद राठोड यांनी दिली. स्वाभिमान दहीहंडी महोत्सव गेल्या १८ वर्षांपासून सातत्याने यशस्वीरीत्या आयोजित करण्यात येत असून यंदाही हा महोत्सव दिमाखदार होणार असल्याचा विश्वास यावेळी त्यांनी बोलताना व्यक्त केला. जिल्ह्यातील विविध स्तरावरील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी “प्राईड ऑफ सिटी” पुरस्कार देऊन केला जाणार खेळाडूंचा सन्मान करण्यात येणार असून दहीहंडी महोत्सवात महाराष्ट्र केसरी विजेते पै. पृथ्वीराज मोहोळ यांची प्रमुख उपस्थिती हे या दहीहंडी महोत्सवाचे विशेष आकर्षण असणार आहे. दहीहंडी महोत्सवादारम्यान महिलांसाठी विशेष आसनव्यवस्था तसेच सुरक्षा व्यवस्था करण्यात आली असून प्रथोमोपंचारासाठी विशेष आरोग्य पथकाचे नियोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात विविध राष्ट्रीय-आंतराष्ट्रीय खेळाडू आपली हजेरी लावणार असून यंदाच्या स्वाभिमान दहीहंडी महोत्सवाचे विशेष आणि खास आकर्षण म्हणजे सहभागी होणारे विविध गोविंदा पथक असणार आहे. या दहीहंडी महोत्सवात गोविंदा पथकाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे व स्वाभिमानाने यंदाचा दहीहंडी महोत्सव साजरा करावा असे आवाहन स्वाभिमान क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद राठोड, उपाध्यक्ष धनंजय अतकरे, संस्थापक सचिव विशाल दाभाडे, दहीहंडी उत्सव समिती अध्यक्ष समीर लोखंडे, प्रदीप राठोड, कार्याध्यक्ष अमर ठाकूर, प्रसिद्धी प्रमुख सचिन लिला सुखदेव अंभोरे यांनी केले आहे.
महाराष्ट्र केसरी पै.पृथ्वीराज मोहोळ यांची राहणार उपस्थिती
महाराष्ट्राच्या अस्सल मराठी मातीतीलमहाराष्ट्र केसरी पै.पृथ्वीराज मोहोळ यांची या दहीहंडी महोत्सवाला उपस्थिती राहणार असून शहरातील कुस्ती पटूना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने यावर्षी त्यांचे विशेष आकर्षण असणार आहे.
स्वाभिमान क्रीडा मंडळ दहीहंडी महोत्सवाची कार्यकारिणी जाहीर
अध्यक्ष पदी समीर लोखंडे, कार्याध्यक्षपदी अमर ठाकूर, यांची निवड
गेल्या १७ वर्षांपासून सातत्याने अखंडरित्या सिडकोतील कॅनॉट प्लेस येथे दरवर्षी स्वाभिमान क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित शहरातील मानाच्या पहिल्या दहीहंडी महोत्सवाला शनिवारी (दि.५) दुपारी दोन वाजता सिडकोतील कॅनॉट प्लेस येथे प्रारंभ होणार असून दहीहंडी उत्सव समितीची कार्यकारिणी स्वाभिमान क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद राठोड, उपाध्यक्ष धनंजय अतकरे, सचिव विशाल दाभाडे यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली.
कार्यकारिणी पुढील प्रमाणे : स्वाभिमान क्रीडा मंडळ दहीहंडी उत्सव २०२६
अध्यक्ष – समीर लोखंडे, कार्याध्यक्ष – अमर ठाकुर सरचिटणीस – श्री . शैलेश भिसे, उपाध्यक्ष – नितेश टेकाळे,उपाध्यक्ष – अभिजित खरात, उपाध्यक्ष – अमान पटेल, सचिव – विशाल काकडे
सचिव -पंकज परदेशी, प्रसिद्धी प्रमुख – सचिन लिला सुखदेव अंभोरे यांची निवड करण्यात आली.
